माझी होशील का?

शब्दांत गोडवा अनोखा
संवाद सुरेख सारे
मनी ओढ अनामिक जैसे
ग्रीष्मात शीतल वारे

भावनांचा अजब गुंता
विचारांत तूच खास
तुझ्या भेटीची लागली
जिवाला वेडी आस

ओळखून प्रेमभाव माझ्या मनाचे
माझी एकदा भेट घेशील का?
भेटवस्तू नकोच मुळी काही
तुझी सोबत भेट म्हणून देशील का?

अन् आपल्या पहिल्या वहिल्या भेटीतच राणी
तु माझी होशील का?
आपल्या पहिल्या वहिल्या भेटीतच राणी
तु माझी होशील का?

टिप्पणी करा

प्रतिक्रिया नोंदवा